सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

द्विधा


आज पुन्हा आरशात तोच चेहरा दिसला ,
जूना झालाय आरसा , विचार मनात आला.

नवीन आता हा काही दाखवत नाही,
Saturation आलय बहुदा , ह्यालाही

एकाच जागी टांगून , ह्याला उबग आला असेल,
त्याच भिंतीकडे सतत बघत , नाविण्य विसरला असेल

पण ह्याला दुसरी जागा तरी कुठली,
प्रत्येक वस्तू आपापल्या जागी वर्षानुवर्षे बसलेली

एका बदलासाठी अनेक बदल गरजेचे होते,
करुनही , साध्य खात्रीचे नव्हते

काय करावे?पुरता गोंधळ उडाला होता,
माझ्या इतकाच आरसा ही, द्विधा मनःस्थितीत होता

शेवटी व्हायचा तोच निर्णय झाला,
समोरच्या भिंतीकडे बघत , आरसा स्थितप्रज्ञ झाला

-अंकुश

रविवार, २१ ऑगस्ट, २०११

मी पण .... , तू पण ...


Sunday Morning... पण नेहमीसारखी नाही.Monday पासूनच ह्या Sunday ची चर्चा.कितीदा plans केले.त्याची उजळणी पण केली.सगळ्यांना फोन करून वेळ confirm केली.almost सगळे तयार झालेले.एक दोन होते दीड शहाणे.आम्हाला अशा गोष्टीत interest नाही असे rude पणे सांगीतले.काही नाही, झोपायचे असेल बूढ वर करून.नेहमीचंच आहे त्यांचे.इतरांपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे भासवायचे.असो...ते महत्त्वाचे नाहित.कार्य महत्त्वाचे.
हां तर Sunday Morning...सगळं set...6 चा गजर लावलेला.आणि back up म्हणून मित्रांना सांगून ठेवलेले ऊठवायला.पटापट आवरले आणि निघालो.bike वर असतानाच १०० calls.कुठे आहेस्,किती वेळ लागेल,कुठे भेटायचे etc. etc...त्यात आदल्या दिवशी discounted price मधे घेतलेले झेंडे,गांधी टोप्या सगळे माझ्याकडेच होतं.एकदाचा पोचलो.मान दुखत होती.फोन मानेत धरुन बोलल्यामुळे.असो...ते महत्त्वाचे नाही.कार्य महत्त्वाचे.
पोचून बघतो तर काय्,ही गर्दी.गाडी लावयला पण जागा नाही.शेवटी एका ठिकाणी मिळवली जागा.म्हणजे तसे No Parking होतं तिथे.पर इतना चलता हैं.main aim तो नाही.आजचा main aim protest...
सगळे जमले,सगळ्यांनी गाल तिरंग्यानी रंगवले.आणलेल्या झेंड्यांचे आणि टोप्यांचे वाटप झाले आणि आमचा मोर्चा निघाला.२-३ मित्रांना camera आणायची जबाबदारी दिली होती.तसे mobile camera होतेच म्हणा.पण SLR पुढे तो फिकाच.
 उत्साह असा ओसंडून वाहत होता.'वंदे मातरम' , 'भारत माता की जय','हम सब एक हैं' अशी जोरदार नारेबाजी चालू होती.येणारे जाणारे आमच्याच कडे बघत होते.काहीजण photos पण काढत होते.वेगवेगळ्या channel वाल्यांची भाऊ गर्दी झाली होती.काही जणांनी आम्हालाही प्रश्न विचारले.आम्ही नीट ठरवलेली उत्तरे दिली.planning च तसे होते,perfect .telecast ची वेळ विचारून घेतली आणि आम्ही पुढे निघालो.
मोर्चा बराच वेळ चालणार होता.म्हणून खायची-प्यायची सोय करने गरजेचे होते.आमची ही पण तयारी चांगली होती.पण आपल्या कडे dustbins च कमी.शेवटी रस्त्याच्या कडेला सगळे गोळा करून ठेवले.
 बरीच भाषणं चालू होती.लोक येत होते जात होते.बरेच नवीन लोक भेटले.नवीन गोष्टी कळल्या.market च्या,job opportunities च्या चर्चा झाल्या.ph nos,email IDs exchange झाले.आणि सरते शेवटी परत भेटण्याच्या निर्णयावर मोर्चा संपला.

सगळे खूष होते.मोर्चा successful झाला होता.तयारीच तशी होती म्हणा.आता कधी एकदा घरी जाउन FB वर ह्याचे updates टाकतोय असे झाले होतं.मित्रांचे 'Like',comments,comments वर comments.ह्याच विचारात असताना एकदम traffic वाले मामा मधे आले.मग लक्षात आले आपण signal तोडला आहे.मी त्यांची मनापासून माफी मागितली.पण ते काही ऐकेनात.मी त्यांना मोर्चा विषयी सांगितलं,झेंडे-टोप्या दाखवल्या.पण त्यांचे आपले एकसारखे प्रश्न सुरुच.license दाखवा,गाडीचे कागद्पत्रं दाखवा,PUC दाखवा etc. etc.सकाळ पासून कोणी भेटले नव्हतं बहुतेक.मोठ्या मिन्नत वारीने त्याला ३०० मधे पटवला.नाहितर १००० काढा म्हणत होता हलकट.
असो...ते महत्त्वाचे नाही.आजचा दिवस special होता.Afterall , I am proud to be part of the protest.updates टाकेनच.तेवढे comment टाकायला विसरू नका.

-अंकुश.

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

रडणे सुद्धा एक कला आहे ....

                                                  
नकोस ढाळू अश्रू , हे तर फक्त खारट पाणी
प्यावे लागेल तुलाच , नाहि आले जर पुसायला कोणी

रडणे सुद्धा कला आहे येड्या  , येरया-गबाळ्याचे काम नाही
अश्रुंची पण किम्मत असते , फुकट इथे वेदना पण नाही

सब खेल हैं बेटा timing का , विनोद काय किंवा रडणे काय
जमले तर टाळ्या , फसले तर , दखल बी मिळत न्हाय

हवाच कोणाचा तरी खांदा , एकांतात काय मजा नसते
देण्यारयाला पण बरे वाटते , आणि घेणारयाचे ही ऐतेच फावते

content च्या मागे लागू नकोस , लोक फक्त outlook च बघतात
काय झाले हे समजण्यासाठी , लेका खूप patience लागतात

शिवाय जितके गूढ जास्त , तितके तूला footage जास्त
अनाकलनिय गोष्टींचे , लोकांना खूप अप्रूप असतं

मधूनच थोडा अभिनय कर , स्वतःच स्वत:ला सावरल्याचा
लोकांना पण कंटाळा येतो , एक सारखा रडणारयाचा

त्यातही असेल कोणीतरी , तुला आतून ओळखणारा
सैल होशिल तिथे थोडसा ,  स्पर्श होताच कातरणारा

भरून राहिल शांतता मग , कल्लोळ फक्त श्वासांचा
ह्याच्याच साठी सारे काहि , अट्टाहास ही रडण्याचा

नसेलच का असे कोणीतरी , जन्मच पामरा तुझा फुका
रडणे तुझे व्यर्थच सारे , लोकांसाठी करमणुका

असेल जर का मुबलक मीठ्-पाणी , अन आशा तुला ही सोडवत नाही
तर रडणे एक कला आहे येड्या , येरया-गबाळ्याचे काम नाही.

- अंकुश

शनिवार, ४ जून, २०११

आजचा खमंग पदार्थ ...

आजचा खमंग पदार्थ - चर्चा

साहित्य : ४-५ स्वतंत्र विचाराचे (किंवा तसे भासवनारे) विचारवंत. हे नसले तरि चालेल्.पण अस्सल मजा येणार नाही.जर हे सगळे भिन्न भाषेचे,भिन्न प्रदेशाचे,भिन्न जातिचे आणि समाजातिल भिन्न स्तरांतिल असले की चव जरा जास्त चांगली येते.चवी मधे वैविध्य येण्यासाठी जर तुमच्याकडे एखादी स्त्री विचारवंत असेल तर उत्तम.
वरिल सर्व घटक नसले तरी चालतील पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे जातिवंत श्रोता (ज्याचे काम फक्त ऐकणे आहे) हा हवाच.नाहितर हा पदार्थ फसलाच म्हणून समजा.
बास्....अजून काहिही नको.इतक्या कमी खर्चाचा , सहज सोपा कुठेही तयार होउ शकणारा पदार्थ आजच्या तारखेला दुसरा नाही.
कृती : तसे बघायला गेले तर वरिल घटक योग्य प्रमणात मिसळले तर वेगळ्या कृतिची काही गरज नाही.पदार्थ आपोआप बनायला लागतो.
पण तरिही जर कोणाकडे वर नमूद केल्यापैकी एखादा घटक नसेल तर त्यांनी रोजचे वर्तमान पत्र घ्यावे आणि उपलब्ध घटकांसमोर ठेवावे.एवढी कृती पुरेशी आहे.
काही लक्षणे : पदार्थ हवा तसा बनतो आहे की नाही ह्याची काही लक्षणे -
सुरवातीला अगदी सौम्य आवाज करत घटक एकमेकांत मिसळत असतिल.साधारण १० मिनट. काही घटक तडतडू लागतील आणि थोडे मोठे आवाज येउ लागतील.२०-२५ मिनट. जोरजोरात आवाज येण्यास चालू होइल आणि तांबूस रंग जमायला लागेल.ह्या पदार्थाची गंमत म्हणजे घटक पदार्थांनुसार तडतडण्याचा आवाज वेगळा असेल. प्रत्येकाचा वेगळा आवाज आणि तडतडण्याची रित ही वेगळी.
बस्...तुमचा पदार्थ तयार.
जर तुमच्या घटकांत स्त्री विचारवंत असेल तर मधून मधून चिरकण्याचे आवाज येतिल आणि थोडे पाणिही सुटेल्.बरयाच जणांना आजकाल हा पदार्थ असाच आवडतो.
जर तुम्हाला जास्त ति़खट खाण्याची सवय असेल किंवा आवड असेल तर एखद्या मउ घटकाला एखद्या कठिण घटकावर आदळा.झणझणीत चव येइल.
वर नमूद केल्यप्रमाणे जर पहिल्या १० मिनट. काहिच प्रगती झाली नाही , तर वर्तमान पत्राचे पान बदलावे आणि क्रिडाव्रुत्त समोर आणावे.
रोज खाल्ला तरी परत खावासा वाटणारा , कुठेही बनू शकणारा,सहज स्वस्त घटकांचा समावेश असणारा असा हा पदार्थ जरुर करुन पहा.अभिप्राय जरुर कळवा कारण त्याचाही उपयोग घटक म्हणून आम्ही करतो.
सूचना : पदार्थ तयार करत असताना जर प्रमाणाबाहेर तडतड होउ लागली तर घटक पदार्थ श्रोता ह्याला बाहेर काढावे.तडतड बंद होइल.
पदार्थ तयार करत असतना जर कोणताही अपघात झाला तर त्याला लेखक जबाबदार असणार नाही.
 
-अंकुश

सोमवार, २१ मार्च, २०११

बिघडलं कुठे ...

शेवटच्या प्रवेशाचा मुखवटा उतरवला आणि,
पहिल्यांदाच रात्रिचा अंधार हवा हवासा वाटला

माझ्याकडून त्याची कोणतिच अपेक्षा नव्हती
आतल्या वादळा इतकिच बाहेर निरव शांतता होती

निपचित पडलेल्या गात्रातुनच एक आवाज आला,
काय मित्रा, कसा आहेस्?बरयाच दिवसांनी भेटला?

आवाज तर ओळखीचा होता,
म्हटले कोण आहेस तु?कुठे आहेस? मला कसा ओळ्खतोस?

नको पाडून घेउस स्वःताला प्रश्न इतके,
जमलच तर वेच,एक एक क्षण्,एकांताचे मोजके

कुड्कुडत , ice-cream ची मजा लुटली नाहिस ना बरयाच दिवसात?
लूट ना मग आज
सुसाट वेगाने रस्त्याच्या मधोमध  Bike  चालवायची होती ना तुला?
कर ना मग आज

बघ चंद्र सुद्धा थोडा  Dim आहे,जा हरवायचे तर हरवून
त्रयस्था सारखे बघ मग, या रंगमंचाकडे , पडद्या बाहेरून

काय होइल, ह्याचि चिंता रोजच करतोस ना?
मग वाट्लच आज्,तर एक झुरका, सिगारेट चा घेऊन बघ ना

दे हासडून शिवी,कोणालाहि , अगदी बेंबिच्या देठापासून,
बिघडले कुठे, जर रड्लास आज , अगदी मनापासून

दिवसा-ढवळ्या असतातच कि वेग-वेगळ्या भुमिका वठवायच्या,
बिन्-चेहरयाच्या रात्रिशीच काय त्या मनमोकळ्या गप्पा मारायच्या

आवाज बंद झाला...रात्र ही सरत आली...
दूरवरून पहिल्या प्रवेशाची घंटा ऐकु आली

मंगळवार, २५ जानेवारी, २०११

"Poem On The Bus" - Metro Bus Service , Seattle

I am Sharp & I'm back
What am I?
of course, I am a piano key
I play beautiful music,
and put pictures of flying notes in your mind
and a story of music to go with it.
Listen to my music
and you'll get the picture,the story and the song
all together !!!

                                       ---- Siri Mellem , age 8

सोमवार, १० जानेवारी, २०११

मराठी बाणा

परवा अशाच गप्पा रंगल्या,महाराष्ट्राच्या इतिहासावर
जाज्वल्य अभिमान जागा झाला,दोन पेग रिचवल्यावर

घड्विला महाराष्ट्र ज्यांनी,त्यांना आठ्वुन मुजरा केला
अटकेपर्यंतचा इतिहास , आम्ही घटकेत पूर्ण केला

इतिहासातले मतभेद , आमच्यातही झाले
आणखी दोन रिचवल्यावर , शब्दाचे अपशब्द झाले

लढ्वले आम्हीच , शिवबाला बाजीराव आणि
टिळ्कांना रामदासांशी
नविन इतिहास घडत होता , एका बाटलिच्या शेवटाशी

मूठी आवळल्या , पैजा झडल्या आणि फुंकले रणशिंग
दुमदुमले आसमंत सारे , काच पावली दुभंग

असे घडावे अकल्पित काही,होती ही तर श्रीं ची ईच्छा
सहाव्या साठी सारयांनीच दिल्या , एकमेकांना शुभेच्छा !!!

आठव्या नंतर प्रत्येक जण , झोके घेउ लागला
इंग्रजी दारु मधे , मराठी बाणा पुरता वाहून गेला

- अंकुश

एका लग्नाची गोष्ट

प्रितिचा सन्देश नभाचा,
पाऊस आतुर येई म्रुगाचा,
मातीहि लाजेत नहाते,
आसमंत गंधाळून जाते

वारयावर ही गोष्ट पसरली,
मोरपिसे तालात थिरकली,
मंडूक बेसुर , तरि गायली,
शालु लेउन तरुवर नटली

आंतरपाठ धराया वीजा धावल्या,
टपोर गारांच्या अक्षता बनविल्या,
सजविला मंडप इंद्रधनुने,
प्रसन्न झाले पाहुने-वाहुने

भरुन आले मग आईला,
अश्रुंचा तर पूरच आला,
गिळून अश्रु खारट झाला,
भरती आली पित्रु-प्रेमाला

क्षितीजावर नभ झुकलेला,
मिलनास आतुर झाहला,
समर्पिले मातीने स्वतःला,
ऋतूही मग बद्लून गेला

-अंकुश

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...