रविवार, २१ ऑगस्ट, २०११

मी पण .... , तू पण ...


Sunday Morning... पण नेहमीसारखी नाही.Monday पासूनच ह्या Sunday ची चर्चा.कितीदा plans केले.त्याची उजळणी पण केली.सगळ्यांना फोन करून वेळ confirm केली.almost सगळे तयार झालेले.एक दोन होते दीड शहाणे.आम्हाला अशा गोष्टीत interest नाही असे rude पणे सांगीतले.काही नाही, झोपायचे असेल बूढ वर करून.नेहमीचंच आहे त्यांचे.इतरांपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे भासवायचे.असो...ते महत्त्वाचे नाहित.कार्य महत्त्वाचे.
हां तर Sunday Morning...सगळं set...6 चा गजर लावलेला.आणि back up म्हणून मित्रांना सांगून ठेवलेले ऊठवायला.पटापट आवरले आणि निघालो.bike वर असतानाच १०० calls.कुठे आहेस्,किती वेळ लागेल,कुठे भेटायचे etc. etc...त्यात आदल्या दिवशी discounted price मधे घेतलेले झेंडे,गांधी टोप्या सगळे माझ्याकडेच होतं.एकदाचा पोचलो.मान दुखत होती.फोन मानेत धरुन बोलल्यामुळे.असो...ते महत्त्वाचे नाही.कार्य महत्त्वाचे.
पोचून बघतो तर काय्,ही गर्दी.गाडी लावयला पण जागा नाही.शेवटी एका ठिकाणी मिळवली जागा.म्हणजे तसे No Parking होतं तिथे.पर इतना चलता हैं.main aim तो नाही.आजचा main aim protest...
सगळे जमले,सगळ्यांनी गाल तिरंग्यानी रंगवले.आणलेल्या झेंड्यांचे आणि टोप्यांचे वाटप झाले आणि आमचा मोर्चा निघाला.२-३ मित्रांना camera आणायची जबाबदारी दिली होती.तसे mobile camera होतेच म्हणा.पण SLR पुढे तो फिकाच.
 उत्साह असा ओसंडून वाहत होता.'वंदे मातरम' , 'भारत माता की जय','हम सब एक हैं' अशी जोरदार नारेबाजी चालू होती.येणारे जाणारे आमच्याच कडे बघत होते.काहीजण photos पण काढत होते.वेगवेगळ्या channel वाल्यांची भाऊ गर्दी झाली होती.काही जणांनी आम्हालाही प्रश्न विचारले.आम्ही नीट ठरवलेली उत्तरे दिली.planning च तसे होते,perfect .telecast ची वेळ विचारून घेतली आणि आम्ही पुढे निघालो.
मोर्चा बराच वेळ चालणार होता.म्हणून खायची-प्यायची सोय करने गरजेचे होते.आमची ही पण तयारी चांगली होती.पण आपल्या कडे dustbins च कमी.शेवटी रस्त्याच्या कडेला सगळे गोळा करून ठेवले.
 बरीच भाषणं चालू होती.लोक येत होते जात होते.बरेच नवीन लोक भेटले.नवीन गोष्टी कळल्या.market च्या,job opportunities च्या चर्चा झाल्या.ph nos,email IDs exchange झाले.आणि सरते शेवटी परत भेटण्याच्या निर्णयावर मोर्चा संपला.

सगळे खूष होते.मोर्चा successful झाला होता.तयारीच तशी होती म्हणा.आता कधी एकदा घरी जाउन FB वर ह्याचे updates टाकतोय असे झाले होतं.मित्रांचे 'Like',comments,comments वर comments.ह्याच विचारात असताना एकदम traffic वाले मामा मधे आले.मग लक्षात आले आपण signal तोडला आहे.मी त्यांची मनापासून माफी मागितली.पण ते काही ऐकेनात.मी त्यांना मोर्चा विषयी सांगितलं,झेंडे-टोप्या दाखवल्या.पण त्यांचे आपले एकसारखे प्रश्न सुरुच.license दाखवा,गाडीचे कागद्पत्रं दाखवा,PUC दाखवा etc. etc.सकाळ पासून कोणी भेटले नव्हतं बहुतेक.मोठ्या मिन्नत वारीने त्याला ३०० मधे पटवला.नाहितर १००० काढा म्हणत होता हलकट.
असो...ते महत्त्वाचे नाही.आजचा दिवस special होता.Afterall , I am proud to be part of the protest.updates टाकेनच.तेवढे comment टाकायला विसरू नका.

-अंकुश.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...