सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०११

द्विधा


आज पुन्हा आरशात तोच चेहरा दिसला ,
जूना झालाय आरसा , विचार मनात आला.

नवीन आता हा काही दाखवत नाही,
Saturation आलय बहुदा , ह्यालाही

एकाच जागी टांगून , ह्याला उबग आला असेल,
त्याच भिंतीकडे सतत बघत , नाविण्य विसरला असेल

पण ह्याला दुसरी जागा तरी कुठली,
प्रत्येक वस्तू आपापल्या जागी वर्षानुवर्षे बसलेली

एका बदलासाठी अनेक बदल गरजेचे होते,
करुनही , साध्य खात्रीचे नव्हते

काय करावे?पुरता गोंधळ उडाला होता,
माझ्या इतकाच आरसा ही, द्विधा मनःस्थितीत होता

शेवटी व्हायचा तोच निर्णय झाला,
समोरच्या भिंतीकडे बघत , आरसा स्थितप्रज्ञ झाला

-अंकुश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...