गोल टपोरा चंद्र आकाशी,
एकटाच निच्छल चांदणी ना पाशी,
तसेच काहिसे माझे इथे रे,
म्हणूनी खेळतो या मोबाईल शी ...
अजूनी आहे दिवस जरासा,
अजूनी बोलायाचे काही,
रात्र चढावर संकेत देइ,
आता शब्द हवे आणि स्पर्श काही
संधी साधून प्रकाश म्हणाला,
चल निशा येतेस का , येतेस का फिरायला...
आज आहे पौर्णिमा , काय सांगू धन्याला
थांब अजून १५ दिवस , घरिच भेटू अमावस्येला ...
चंद्र आज थोडा रागावलाय , लाल लाल होउन फुगून बसलाय
रंग सूर्याकडून घेतला आहे उधार जसा, तरी ह्याचा प्रकाश शितल कसा
मूळ स्वभाव म्हणतात ना,सहसा कधी बद्लत नाही
म्हणूनच 'मधू' कधी चंद्रापासून दूर होत नाही.
mast aahe re kavita. bus madhye baslyanantar yevdha changla suchta he mahit navhta :)
उत्तर द्याहटवा