शेवटच्या प्रवेशाचा मुखवटा उतरवला आणि,
पहिल्यांदाच रात्रिचा अंधार हवा हवासा वाटला
माझ्याकडून त्याची कोणतिच अपेक्षा नव्हती
आतल्या वादळा इतकिच बाहेर निरव शांतता होती
निपचित पडलेल्या गात्रातुनच एक आवाज आला,
काय मित्रा, कसा आहेस्?बरयाच दिवसांनी भेटला?
आवाज तर ओळखीचा होता,
म्हटले कोण आहेस तु?कुठे आहेस? मला कसा ओळ्खतोस?
नको पाडून घेउस स्वःताला प्रश्न इतके,
जमलच तर वेच,एक एक क्षण्,एकांताचे मोजके
कुड्कुडत , ice-cream ची मजा लुटली नाहिस ना बरयाच दिवसात?
लूट ना मग आज
सुसाट वेगाने रस्त्याच्या मधोमध Bike चालवायची होती ना तुला?
कर ना मग आज
बघ चंद्र सुद्धा थोडा Dim आहे,जा हरवायचे तर हरवून
त्रयस्था सारखे बघ मग, या रंगमंचाकडे , पडद्या बाहेरून
काय होइल, ह्याचि चिंता रोजच करतोस ना?
मग वाट्लच आज्,तर एक झुरका, सिगारेट चा घेऊन बघ ना
दे हासडून शिवी,कोणालाहि , अगदी बेंबिच्या देठापासून,
बिघडले कुठे, जर रड्लास आज , अगदी मनापासून
दिवसा-ढवळ्या असतातच कि वेग-वेगळ्या भुमिका वठवायच्या,
बिन्-चेहरयाच्या रात्रिशीच काय त्या मनमोकळ्या गप्पा मारायच्या
आवाज बंद झाला...रात्र ही सरत आली...
दूरवरून पहिल्या प्रवेशाची घंटा ऐकु आली

baryach diwsanni Ankush! Aajach tuzya baddal vishay chalu hota mazya US mitransobat. And glad to see your blog right after the discussion!
उत्तर द्याहटवाmast re ankya !
उत्तर द्याहटवाLai Bhari Rao!
उत्तर द्याहटवाKya baat hain :)
उत्तर द्याहटवा