बुधवार, १९ मे, २०२१

सांग ना बाबा...

 सांग  ना  बाबा , किस्सा  लहानपणीचा  तुमच्या  

कशी  करायचा  गम्मत  अन  खोड्या  कुणाकुणाच्या 


कसे  होते  टीचर , कशी  होती  शाळा ,

किती  होते  क्लास , कशा  होत्या  वेळा 


शाळा  होती  साधी-सुधी , कडक  शिस्तीचे  शिक्षक 

क्लास  होते  मोजके , सोपे  वेळापत्रक 


तुटके  बेंच , फुटक्या  खिडक्या , किरकिरणारा  पंखा

काळा फळा, खडूचा  धुरळा , शेजारी  मात्र  सखा 


कधी  पट्टी , कधी  डस्टर , कधी  नुसता  हाताचा  फटका 

घरचे  म्हणती  बरे  झाले  "तूच  चुकला  असशील  लेका "


एकच  कंपास , एकच  बॅट वर्षानुवर्षे  आम्हास  चाले 

वाढदिवस -दिवाळी  नवीन  कपडे , एवढे  कौतुक  खूप  झाले 


पोळी -भाजी  रोज  डब्यात , प्यायला  नळाचे  पाणी 

खास  पदार्थ  फक्त  रविवारी , हॉटेल  म्हणजे  पर्वणी 


मोबाईल शिवाय  सगळे  जमती  एकच  वेळी  मैदानावर 

रिमोट  साठी  भांडण  नाही , एकच  चॅनेल  TV वर 


हजारो  किस्से  बालपणीचे , किती  आठवायचे  किती  सांगायचे 

काही  कळतील  सहज  तुला , काही  कदाचित  नाही  उमगायचे 


सोपे  सरळ  होते  सारे , साधी  होती  रहाणी 

पाचा  उत्तरी  सुफळ  झाली  साठा  उत्तराची  कहाणी 


-अंकुश 

५ टिप्पण्या:

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...