सांग ना बाबा , किस्सा लहानपणीचा तुमच्या
कशी करायचा गम्मत अन खोड्या कुणाकुणाच्या
कसे होते टीचर , कशी होती शाळा ,
किती होते क्लास , कशा होत्या वेळा
शाळा होती साधी-सुधी , कडक शिस्तीचे शिक्षक
क्लास होते मोजके , सोपे वेळापत्रक
तुटके बेंच , फुटक्या खिडक्या , किरकिरणारा पंखा
काळा फळा, खडूचा धुरळा , शेजारी मात्र सखा
कधी पट्टी , कधी डस्टर , कधी नुसता हाताचा फटका
घरचे म्हणती बरे झाले "तूच चुकला असशील लेका "
एकच कंपास , एकच बॅट वर्षानुवर्षे आम्हास चाले
वाढदिवस -दिवाळी नवीन कपडे , एवढे कौतुक खूप झाले
पोळी -भाजी रोज डब्यात , प्यायला नळाचे पाणी
खास पदार्थ फक्त रविवारी , हॉटेल म्हणजे पर्वणी
मोबाईल शिवाय सगळे जमती एकच वेळी मैदानावर
रिमोट साठी भांडण नाही , एकच चॅनेल TV वर
हजारो किस्से बालपणीचे , किती आठवायचे किती सांगायचे
काही कळतील सहज तुला , काही कदाचित नाही उमगायचे
सोपे सरळ होते सारे , साधी होती रहाणी
पाचा उत्तरी सुफळ झाली साठा उत्तराची कहाणी
-अंकुश
अप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाझकास 👍...कविता वाचता वाचता डोळ्यासमोर माझी शाळा आली आणि भरून आले
उत्तर द्याहटवा🙏🏻 Dhanyawad
हटवाVery good!!
उत्तर द्याहटवाToo good Ankush .. agadi kharech shale che divas athavale. Beautiful days. You have put those memories in apt and perfect words. Lovely
उत्तर द्याहटवा