शनिवार, २० ऑगस्ट, २०११

रडणे सुद्धा एक कला आहे ....

                                                  
नकोस ढाळू अश्रू , हे तर फक्त खारट पाणी
प्यावे लागेल तुलाच , नाहि आले जर पुसायला कोणी

रडणे सुद्धा कला आहे येड्या  , येरया-गबाळ्याचे काम नाही
अश्रुंची पण किम्मत असते , फुकट इथे वेदना पण नाही

सब खेल हैं बेटा timing का , विनोद काय किंवा रडणे काय
जमले तर टाळ्या , फसले तर , दखल बी मिळत न्हाय

हवाच कोणाचा तरी खांदा , एकांतात काय मजा नसते
देण्यारयाला पण बरे वाटते , आणि घेणारयाचे ही ऐतेच फावते

content च्या मागे लागू नकोस , लोक फक्त outlook च बघतात
काय झाले हे समजण्यासाठी , लेका खूप patience लागतात

शिवाय जितके गूढ जास्त , तितके तूला footage जास्त
अनाकलनिय गोष्टींचे , लोकांना खूप अप्रूप असतं

मधूनच थोडा अभिनय कर , स्वतःच स्वत:ला सावरल्याचा
लोकांना पण कंटाळा येतो , एक सारखा रडणारयाचा

त्यातही असेल कोणीतरी , तुला आतून ओळखणारा
सैल होशिल तिथे थोडसा ,  स्पर्श होताच कातरणारा

भरून राहिल शांतता मग , कल्लोळ फक्त श्वासांचा
ह्याच्याच साठी सारे काहि , अट्टाहास ही रडण्याचा

नसेलच का असे कोणीतरी , जन्मच पामरा तुझा फुका
रडणे तुझे व्यर्थच सारे , लोकांसाठी करमणुका

असेल जर का मुबलक मीठ्-पाणी , अन आशा तुला ही सोडवत नाही
तर रडणे एक कला आहे येड्या , येरया-गबाळ्याचे काम नाही.

- अंकुश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...