काहीच मिनिटं राहिली आहेत आणि मला अजून बऱ्याच लाईन्स चा कोड लिहायचा आहे. जिवाच्या आकांताने मी कीबोर्ड वर बोटं आदळतोय . किती लिहितोय आणि किती 'backspace' करतोय मलाच कळत नाही आहे . मॅनेजर चा unpleasant चेहरा मला दिसायला लागलाय . "You had the entire weekend and still you could not complete it on time. Can you explain why?" जितका तुसडा भाव येईल तितका वापरून तो विचारताना दिसतोय . अचानक मोठ-मोठ्याने बेल चा आवाज येऊ लागतो . "Ohhh nooo...Fire ड्रिल तर नाही ? संपला खेळ ..." मी मनात म्हणतो . बेल चा आवाज मोठा आणि असह्य होतोय .आता बास्स्स ... मी ओरडतो आणि दचकून जागा होतो .
घाणेरडं स्वप्न . "Monday Blues " ह्यालाच म्हणतात बहुतेक . Obviously हा snooze करत करत झालेला चौथा-पाचवा अलार्म असावा . हल्ली प्रत्येक Monday ला उठायच्या नावाने शंखच असतो माझा . दर Sunday ला ठरवतो रात्री लवकर झोपायचे , पण झोप येईल तर शप्पथ (दुपारी ताणून देतो हे कंसात टाकलाय मुद्दाम ). जागे व्हायला वेळ लागत नाही मला. डोक्यात लगेच calculations झाले , जर बस पकडायची असेल तर पुढच्या १५ mins मध्ये मी घराच्या बाहेर हवा , मग बस स्टॉप पर्यंत जायला 7 mins.
15 mins मध्ये सगळे आवरणे कसे शक्य आहे ? पण आपण "Homo Sapiens " आहोत , evolve होतो . खास Monday च्या आंघोळीची technique मी विकसित केली आहे ...MBT, Monday Bath Technique (ह्यालाच आपल्याकडे पूर्वम्पार कावळ्याची अंघोळ असे म्हणतात ). दुःख एकच होते ...सकाळचा चहा चुकणार ...आणि मग निम्मा दिवस जांभया देण्यात जाणार ...तसे माझ्या अजून एका Homo Sapien मित्राने उरलेली झोप Toilet मध्ये कशी पूर्ण करावी ह्याचे हि तंत्र शोधून काढले आहे , पण मला अजून ते आत्मसात झाले नाही ...
असो, 15 min मी घराच्या बाहेर होतो. झपाझप बस स्टॉप कडे निघालो .वाटेत अमृततुल्य (tea stall for non-punekars) दिसले . चहाचा मोह आवरेना . वेळ कमी होता , रिस्क जास्त होती . पण मी गेलो , फुल्ल च्या ऐवजी कटिंग घेतला , गटागट गरम चहा प्यायलो (अजून एक Homo Sapien technique) आणि बस स्टॉप कडे कूच केले .
साधारण 400-500 मीटर अंतर असेल . मला बस दिसली. स्टॉप वर अली होती. माझ्यातला
मिल्खा सिंग जागा झाला . I was also literally flying towards the bus stop. सकाळची ऑफिस बस पकडणाऱ्यांना ऑलिम्पिक मध्ये चान्स दिला तर ब्रॉंझ नक्की मिळेल . उगाच आपला एक विचार पळता पळता . असो, पण Monday ला बस ड्राइवर पण वेगळ्या मूड मध्ये असतात . मला पळत येताना बघूनही ड्राइवर ने गाडी सोडली आणि ती हि जोरात . मी बस च्या मागून जिवाच्या आकांताने (अतिशयोक्ती आहे ) पळत होतो आणि 'थांबा , थांबा' ओरडत होतो . पण , "White Collar " वाले लोक कसे वेळ पाळत नाहीत ह्यावर परिसंवाद ठेवला तर त्याचा प्रमुख वक्ता जसा त्वेषाने बोलेल त्याच त्वेषाने ड्राइवर गाडी चालवत होता.
मी हरलो ... छातीचा भाता जोराने चालू होता . हात गुडघ्यावर , घाम कपाळावर आणि नजर लांब जाणाऱ्या बस वर. आता काय करायचे असा विचार करतच होतो, तेवढ्यात आवाज आला , "बस पटकन ...". माझ्या शेजारी एक Bike वाला उभा होता आणि मला बसायला सांगत होता . मी आपसूकच बसलो . मग bike च्या ad ला लाजवेल असा तो वाट काढत निघाला . बस वाल्याने आम्हाला side mirror मध्ये नक्की बघितले असणार , मला खात्रीच आहे , कारण त्याने स्पीड अजून वाढवला . पण तो शेर होता तर आपला भाऊ सव्वाशेर . झूम झूम करत त्याने बस गाठलीच आणि बस च्या आडवीच bike लावली .
बस थांबली . मी चटकन Bike वरून उतरलो आणि झपाझप बस च्या पायऱ्या चढलो . ड्राइवर ने "कशी जिरवली " असे लूक दिले . लहानपणापासून ऐकलेल्या सगळ्या शिव्या आठवल्या. पण "मनाचा Brake , उत्तम brake " प्रमाणे मी सगळ्या शिव्या गिळून टाकल्या . मग एकदम आठवले आपल्या bike वाल्या भाऊ बद्दल . गडबडीत मी त्याला थँक्स पण म्हणालो नाही . मी उभ्या उभ्याच वळून बघितले , तो bike side ला घेऊन थांबला होता . मी नीट बस मध्ये चढलो हे बघून माझ्या पेक्षा जास्त त्याला हायसे वाटले होते . आमची फक्त नजरा-नजर झाली आणि दोघांच्याही चेहऱ्यावर smile झळकले .
सीट वर बसता बसता मी तो कोण होता ते आठवत होतो . चेहरा पहिल्या सारखा . फार वेळ लागला नाही आठवायला . अमृततुल्य वर बऱ्याचदा दिसतो . आज हि होता बहुतेक . तोंड ओळख नुसती . नाव माहित नाही , कुठे राहतो माहित नाही, काय करतो माहित नाही . पण काय फरक पडतो . त्याच्या छोट्याश्या कृतीने सकाळपासूनची सगळी नेगेटिव्हिटी गायब झाली . ड्राइवर वरचा राग पण गेला . माझा दिवस चांगला जाईलच आणि माझी खात्री आहे त्याचा पण दिवस चांगलाच जाईल .
आता त्याला मी बऱ्याचदा अमृततुल्य वर बघतो . म्हणजे तो आधीही होता पण मी आता नोटीस करतो किंवा नकळत शोधतो . नजरा नजर होते , smiles exchange होतात . मला अजूनही त्याचे नाव माहित नाही . पण काय फरक पडतो .
- अंकुश
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा