झाड
पानगळ नेहमीचीच , पानं मात्र वेगळी
एकाच फांद्यांवर खेळ्लेली , लेकरं ही सगळी
जाणारयांचे दु:ख करयाचे , की येणारयांचे स्वागत
समतोलाची ही कला कशी होते अवगत?
सोपे नसते असे , तटस्थ होउन रहाणे
भोवतलच्या वादळाकडे , मुके पणाने पहाणे
मातीच लागते तशी , अन तसंच लागते बीज
तेंव्हा कुठे घेता येते , कवे मधे वीज
नाही राहत मग मागे काही मग उन्मळूनही पड्ताना
जसे नसते राहत , सावली धरताना अन सरणावर चढताना
- अंकुश