परवा अशाच गप्पा रंगल्या,महाराष्ट्राच्या इतिहासावर
जाज्वल्य अभिमान जागा झाला,दोन पेग रिचवल्यावर
घड्विला महाराष्ट्र ज्यांनी,त्यांना आठ्वुन मुजरा केला
अटकेपर्यंतचा इतिहास , आम्ही घटकेत पूर्ण केला
इतिहासातले मतभेद , आमच्यातही झाले
आणखी दोन रिचवल्यावर , शब्दाचे अपशब्द झाले
लढ्वले आम्हीच , शिवबाला बाजीराव आणि
टिळ्कांना रामदासांशी
नविन इतिहास घडत होता , एका बाटलिच्या शेवटाशी
मूठी आवळल्या , पैजा झडल्या आणि फुंकले रणशिंग
दुमदुमले आसमंत सारे , काच पावली दुभंग
असे घडावे अकल्पित काही,होती ही तर श्रीं ची ईच्छा
सहाव्या साठी सारयांनीच दिल्या , एकमेकांना शुभेच्छा !!!
आठव्या नंतर प्रत्येक जण , झोके घेउ लागला
इंग्रजी दारु मधे , मराठी बाणा पुरता वाहून गेला
- अंकुश
zakas re ..... Omya la fwd kar he :) tyacha thodasa aasach aahe :)))
उत्तर द्याहटवा"लढ्वले आम्हीच , शिवबाला बाजीराव आणि
उत्तर द्याहटवाटिळ्कांना रामदासांशी"
हे खूप जबर बोललास�!