रविवार, २३ जुलै, २०२३
रविवार, १६ जुलै, २०२३
प्रश्न...
अमुक असं का, तमुक असं का नाही
प्रश्न वाढतात रोजचे, उत्तर मिळत नाही
विचारांचा गुंता होतो आणि डोक्याचा भुगा
सोडवू प्रश्न कसे, कृपया कोणीतरी सांगा
मलाच पडतात का, प्रश्न असे क्लिष्ट अन अवघड ?
मीच वाहतोय का, नैतिकतेची अन तत्वज्ञानाची कावड?
तुम्ही करता का, विचार कधी खोल ?
मती जिथे गुंगते अन तत्वज्ञान ठरतं फोल ?
पण कधीतरी अचानक एखादं उत्तर मिळून जातं
अस्तित्वाचं सार थोडं थोडं उलगडून जातं
प्रश्न सतत पडणं, हेही वरदान नव्हे काय ?
रोज थोडं उलगडणे, हेच जीवन नव्हे काय?
मार्ग दाखवी तो गुरु, आणि चाले तो शिष्य
अनुभूतींचा प्रवास म्हणजेच तर खरं आयुष्य
त्यातूनही अनुत्तरित, राहतील काही गोष्टी
जन्म देऊन पुन्हा, संकेत देईल सृष्टी
- अंकुश
गुरुवार, २ मार्च, २०२३
तेच तेच परत परत ...
अजून एक गिरकी घेतली, स्वतःभोवती वसुधेने
आला दिवस तसाच गेला, घडले नित्य नेमाने
आयुष्य साला अगदी, copy-paste झालंय
आजचे, उद्याचे, सगळे अगदी same झालंय
भाज्यांनीही आपापसात, वार वाटून घेतलेत
तीच चव, तोच वास, सगळेच ओळखीचे झालेत
कपड्यांची पण तीच तऱ्हा, नंबर येतो आलटून पालटून
तेच नऊ दर वर्षी, नवरात्रीला ठरवून
फिरायलाही तिथेच जातो, शनिवार -रविवार येता
तेच hotels, त्याच dishes, खायची वेळ होता
तेच तेच कार्यक्रम बघतो, TV वर आणि Mobile वर
आताशा तर हसू हि येत नाही, त्याच त्याच विनोदावर
वेगळे काहीतरी करून, वाटते जमाना झाला
आणि आम्ही नित्य म्हणतो, routine चा कंटाळा आला
उत्सुकता आणि रसिकता, जशी आमची हरवली
एकाच दिशेत प्रवास, जशी दिली कोणी किल्ली
आमचाच रोबो झालाय, रोबो बनवताना
चौकटीत अडकलोय, सोडून स्वछंदीपणा
- अंकुश
माधुरी
परवा चक्क स्वप्नात माधुरी आली, गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...
-
सांग ना बाबा , किस्सा लहानपणीचा तुमच्या कशी करायचा गम्मत अन खोड्या कुणाकुणाच्या कसे होते टीचर , कशी होती शाळा , किती होते ...
-
Sunday Morning... पण नेहमीसारखी नाही.Monday पासूनच ह्या Sunday ची चर्चा.कितीदा plans केले.त्याची उजळणी पण केली.सगळ्यांना फोन करून वेळ conf...
-
मला ना अताशा तुझा, कंटाळा यायला लागलाय खेळणं बनून हातचं, जीव नकोसा झालाय चुका करतोस तू आणि, दूषणं मला मिळतात व्यसनांच्या क्रमवारीत सध्य...