प्रितिचा सन्देश नभाचा,
पाऊस आतुर येई म्रुगाचा,
मातीहि लाजेत नहाते,
आसमंत गंधाळून जाते
वारयावर ही गोष्ट पसरली,
मोरपिसे तालात थिरकली,
मंडूक बेसुर , तरि गायली,
शालु लेउन तरुवर नटली
आंतरपाठ धराया वीजा धावल्या,
टपोर गारांच्या अक्षता बनविल्या,
सजविला मंडप इंद्रधनुने,
प्रसन्न झाले पाहुने-वाहुने
भरुन आले मग आईला,
अश्रुंचा तर पूरच आला,
गिळून अश्रु खारट झाला,
भरती आली पित्रु-प्रेमाला
क्षितीजावर नभ झुकलेला,
मिलनास आतुर झाहला,
समर्पिले मातीने स्वतःला,
ऋतूही मग बद्लून गेला
-अंकुश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
माधुरी
परवा चक्क स्वप्नात माधुरी आली, गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...
-
Security Guard तिची बॅग चेक करत होता. तिची नजर त्याला शोधत होती. तेवढ्यात त्याचा आवाज मागून आलाच. "नीट चेक कर रे मॅडम ची बॅग. आजकाल डब...
-
मला ना अताशा तुझा, कंटाळा यायला लागलाय खेळणं बनून हातचं, जीव नकोसा झालाय चुका करतोस तू आणि, दूषणं मला मिळतात व्यसनांच्या क्रमवारीत सध्य...
-
" एक मसाला डोसा " , त्याने पैसे देऊन कूपन घेतले . मला पण मसाला डोसा , मी म्हणाले . मग लक्षात आलं , " मला पण ...
Chaan..
उत्तर द्याहटवाikdam mast
उत्तर द्याहटवाzakas re. laich bahri , mast
उत्तर द्याहटवाekdm sahi re... tu evdhya chan kavita lihitos he mahit navate!!
उत्तर द्याहटवा