बुधवार, १७ जून, २०२०

'जगणं' हरवलं आहे ....

अजूनही आहे छत डोक्यावर ,
अजूनही घास पडतो पोटात, आणि अजूनही न वापरलेले कपडे कपाटात
गरजा भागल्या माणसाच्या , मन शोधात समाधानाच्या

गरज आणि समाधान दोन भिन्न नाणी ,
एकाचा भार खिशाला, वास करतो दुसरा मनी

खिसा जाड पण मन रिते असून चालत नाही ,
मन भरलेले असले कि खिसा जाणवतहि नाही

गोष्ट तशी साधी सोपी तरी काहीतरी बिनसत चाललंय ,
खिसा आहे पुरेसा जाड, मन रिते होत चाललंय

माणूस मात्र पण भले हुशार,
खिसा हलका आणि युक्त्या हजार

कळपात राहणार आता भासात राहू लागला,
दुधाची तहान माणूस ताकावर भागवू लागला

अमाप झाली साधने, भास निर्माण करण्याची
येईल का पण सर त्यांना , जाणिवेच्या स्पर्शांची

अन्न -वस्त्र-निवारा वर 'जीवन' तर चालू आहे
आभासी दुनियेच्या जंगलात  'जगणं ' तेवढे हरवलं आहे

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...