गाझ ऐकत पाण्याची , बसून रहायचे काठाशी
मळभ सगळे जाते धुवून , फक्त एका लाटेसरशी
हलके व्ह्यायचे इतके कि वारयाची झुळूक ही उडवून नेईल
आपोआप जाऊन पोहोचायचे मग तीरावर , पलीकडील
हळूवार एक एक पाऊल उचलत,चालायचे पाण्यावर
शोधायच्या पाऊलखूणा , थोडे पुढे आल्यावर
पाण्यावर पसरलेला सूर्य , मग ओंजळीत घ्यायचा
परत पाण्यात सोडताना , आपला चेहरा त्यात मिसळायचा
अधःमुख होउन मग बसायचे,वाट पहात अंधारची
सोडून द्यायच्या चिंता पाण्यात , घेऊन कडा काळोखाची
मागे वळून बघायचे , परत येता किनारयावर
उद्या परत असाच येइन , दिवस मालवत आल्यावर
-अंकुश