शनिवार, ४ जून, २०११

आजचा खमंग पदार्थ ...

आजचा खमंग पदार्थ - चर्चा

साहित्य : ४-५ स्वतंत्र विचाराचे (किंवा तसे भासवनारे) विचारवंत. हे नसले तरि चालेल्.पण अस्सल मजा येणार नाही.जर हे सगळे भिन्न भाषेचे,भिन्न प्रदेशाचे,भिन्न जातिचे आणि समाजातिल भिन्न स्तरांतिल असले की चव जरा जास्त चांगली येते.चवी मधे वैविध्य येण्यासाठी जर तुमच्याकडे एखादी स्त्री विचारवंत असेल तर उत्तम.
वरिल सर्व घटक नसले तरी चालतील पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे जातिवंत श्रोता (ज्याचे काम फक्त ऐकणे आहे) हा हवाच.नाहितर हा पदार्थ फसलाच म्हणून समजा.
बास्....अजून काहिही नको.इतक्या कमी खर्चाचा , सहज सोपा कुठेही तयार होउ शकणारा पदार्थ आजच्या तारखेला दुसरा नाही.
कृती : तसे बघायला गेले तर वरिल घटक योग्य प्रमणात मिसळले तर वेगळ्या कृतिची काही गरज नाही.पदार्थ आपोआप बनायला लागतो.
पण तरिही जर कोणाकडे वर नमूद केल्यापैकी एखादा घटक नसेल तर त्यांनी रोजचे वर्तमान पत्र घ्यावे आणि उपलब्ध घटकांसमोर ठेवावे.एवढी कृती पुरेशी आहे.
काही लक्षणे : पदार्थ हवा तसा बनतो आहे की नाही ह्याची काही लक्षणे -
सुरवातीला अगदी सौम्य आवाज करत घटक एकमेकांत मिसळत असतिल.साधारण १० मिनट. काही घटक तडतडू लागतील आणि थोडे मोठे आवाज येउ लागतील.२०-२५ मिनट. जोरजोरात आवाज येण्यास चालू होइल आणि तांबूस रंग जमायला लागेल.ह्या पदार्थाची गंमत म्हणजे घटक पदार्थांनुसार तडतडण्याचा आवाज वेगळा असेल. प्रत्येकाचा वेगळा आवाज आणि तडतडण्याची रित ही वेगळी.
बस्...तुमचा पदार्थ तयार.
जर तुमच्या घटकांत स्त्री विचारवंत असेल तर मधून मधून चिरकण्याचे आवाज येतिल आणि थोडे पाणिही सुटेल्.बरयाच जणांना आजकाल हा पदार्थ असाच आवडतो.
जर तुम्हाला जास्त ति़खट खाण्याची सवय असेल किंवा आवड असेल तर एखद्या मउ घटकाला एखद्या कठिण घटकावर आदळा.झणझणीत चव येइल.
वर नमूद केल्यप्रमाणे जर पहिल्या १० मिनट. काहिच प्रगती झाली नाही , तर वर्तमान पत्राचे पान बदलावे आणि क्रिडाव्रुत्त समोर आणावे.
रोज खाल्ला तरी परत खावासा वाटणारा , कुठेही बनू शकणारा,सहज स्वस्त घटकांचा समावेश असणारा असा हा पदार्थ जरुर करुन पहा.अभिप्राय जरुर कळवा कारण त्याचाही उपयोग घटक म्हणून आम्ही करतो.
सूचना : पदार्थ तयार करत असताना जर प्रमाणाबाहेर तडतड होउ लागली तर घटक पदार्थ श्रोता ह्याला बाहेर काढावे.तडतड बंद होइल.
पदार्थ तयार करत असतना जर कोणताही अपघात झाला तर त्याला लेखक जबाबदार असणार नाही.
 
-अंकुश

माधुरी

 परवा चक्क स्वप्नात माधुरी आली,  गोड लाजत हसत “साजन”च म्हणाली  पहाटेचं स्वप्न, मन शहारून गेलं खसखसून साबणाने, अंग धुवून काढलं नविन शर्टची घड...